" काल संध्याकाळी दोन च फुलं होती "
" हो "
" ... आणि आज पहाटे ओंजळ भर..."
" कालच्या आजूबाजूच्या कळ्या आज उमलल्या."
" ओंजळ तुझी च आहे ना..."
" ...."
" ...आत्ता लक्षात आले तुला काय म्हणायचं... "
" मनस्वी मना... "
" काही आठवणी मनाच्या कप्प्यात नाही तर मनाच्या कुपीत साठवल्या जातात. ."
" सगळ्यांच्याच.…"
" पण सगळ्याच नाहीत ".
" असेलही तसे. "
" तुझीच कविता आहे ना...
सहवासाच असच असत
कळ्याना फुलं करत
आणि सुगंधा ला आठवण. "
" आठवण... "
" आठवण हा शब्द नको. "
" का ? "
" पुन्हां मग तुझीच कविता...
काही आठवत
तेंव्हा ते
कृष्ण- धवल च असते.
डोळ्यांतले पाणी
मनांत उतरते."
१ जानेवारी २०२१.
No comments:
Post a Comment