Monday, January 4, 2021

झुंबर


मनातलं झुंबर

चित्रांत येते

टांगणीला जीव

लावून जाते.


एकाच डहाळीवर

आहोत सांगत राहाते

कानातलं झुंबर

गालाला भासते.


हिरव्या हर्षित मनांत

स्वप्नांचे झुंबर रंगते

गोऱ्या- सावळ्या वर्णाला

गुलाबी- लाली आणते.







४ जानेवारी २०२१ .

मनस्वी मन

" काल संध्याकाळी दोन च फुलं होती "

" हो "

" ... आणि आज पहाटे ओंजळ भर..."

" कालच्या आजूबाजूच्या कळ्या आज उमलल्या." 

 " ओंजळ तुझी च आहे ना..." 

" ...."

" ...आत्ता लक्षात आले तुला काय म्हणायचं... " 

" मनस्वी मना... " 

" काही आठवणी मनाच्या कप्प्यात नाही तर मनाच्या कुपीत साठवल्या जातात. ." 

" सगळ्यांच्याच.…"

" पण सगळ्याच नाहीत ".

" असेलही तसे. "

" तुझीच कविता आहे ना...

 सहवासाच असच असत

कळ्याना फुलं करत

आणि सुगंधा ला आठवण. " 

" आठवण... "

" आठवण हा शब्द नको. "

" का ?  " 

" पुन्हां मग तुझीच कविता... 

काही आठवत

तेंव्हा ते

कृष्ण- धवल च असते.

डोळ्यांतले पाणी

मनांत उतरते."






१ जानेवारी २०२१.

बकुळ

             


ते प्रत्यक्षात कमी 

आणि आठवणींत जास्त असते.

असं टिकायच असते

म्हणून ते खरखरीत असते.


बकुळीचे झाड

हलवावे लागत नाही

आठवणीं जाग्या

व्हायच्या राहात नाही.


पडतं तसं

एक- दोन, एक- दोन करत

अलगद आवाजाने

अलवार ओंजळ भरत.






३१ डिसेंबर २०२०.