सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक यांचे नुकतंच प्रसिद्ध झालेले अर्थानुभुती हे पुस्तक वाचनात आले. तस म्हटलं तर अर्थशास्त्र हा विषय जरा डोईजडच आहे समजायला.
हे पुस्तक म्हणजे जणुकाही एक छानस अर्थशास्त्रीय कथानक आहे. या पुस्तकात एकंदर सहा लेख आहेत. रोज एक असे करून मी सर्व वाचले. बर्याच गोष्टींचा उलगडा झाला. आपला रुपया हा लेख खुपच आवडला व उपयुक्त वाटला. 1947 पासुन 2014 पर्यंत चा आपल्या रुपयाचा प्रवास छान मंडला आहे. ही माहिती एकत्रित कोठेही मिळणे अवघड आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, बाजार पेठ सन्शोधन, मुद्रा बाजार, गुंतवणुक सल्लागार, बँक तसेच वित्तीय संस्था याना हा लेख व पुस्तक खूप उपयोगाचे आहे.
श्री. टिळक यान्चा अर्थशास्त्र विषयावरील गाढा अभ्यास व अनुभव याची प्रचिती म्हणजे या लेख मालिकेची निर्मिती आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी, संशोधक, व्याख्याते, प्राध्यापक, गुंतवणुक सल्लागार, वित्तीय संस्थे मधील वर्ग यानी हे पुस्तक जरुर वाचावे. एक अर्थशास्त्रीय वेगळी दिशा, विचार, पार्श्वभूमी, परिस्थिती व कारण मिमान्सा लक्षात येते. ग्रंथालयात हे पुस्तक जरुर संग्रही असायला पाहिजे.
या पुस्तकाची इंग्रजी अनुवादीत आवृत्ती काढल्यास अमराठी वाचकांना देखील याचा लाभ घेता येईल. तो जरुर लौकरच प्रकाशित करावा अशी मी श्री. टिळक याना आग्रहाची विनंती करतो.या पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ट, आकर्षक छपाई व माफक किमत या अजुन काही जमेच्या बाजू आहेत. श्री. टिळक यांचे मी या पुस्तकाच्या ऊत्तम लेखना बद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो. असेच भरपुर अर्थशास्त्रीय लिखाण त्यांच्या लेखणी मधुन बाहेर पडो होवो ही सदिच्छा.
डॉ.अनिल धनेश्वर,
व्यवस्थापकीय संचालक, जेनेसीस मार्केट रिसर्च, पुणे,
दूरध्वनि 9890303389
Email anil@gmmr.in
No comments:
Post a Comment