याला असणारा सणसणीत अपवाद म्हणजे चन्द्रशेखर टिळक सरांची आर्थिक विषयांवरील भाषणे.
आणि
अगदी आत्ताच १ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे प्रकाशित झालेले " अर्थानुभुती " हे पुस्तक.
सरांचे प्रकाशित होणारे हे २५ वे पुस्तक.
या पुस्तकात त्यांच्या आर्थिक विषयांवरील निवडक भाषणांचा समावेश आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच या पुस्तकाचे आगळे- वेगळेपण सुरू होते. सध्याच्या चिंतातुर वातावरणात या पुस्तकाचे आल्हाददायक मुखपृष्ठ लक्ष वेधून घेत राहाते. दिवाळी अंक विकत घ्यायला दुकानात गेलेलो मी मुखपृष्ठ आणि लेखक म्हणून सरांचे नाव वाचून हे पुस्तक विकत घेऊनच बाहेर पडलो.या पुस्तकात घेतलेली सगळीच भाषणे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. " बदलते जागतिक आर्थिक नातेबंध " हे या पुस्तकातले पहिलेच प्रकरण वाचताना क्षणभर मनात आले कि सध्याच्या कोरोना नंतरच्या परिस्थिती शी याचं खूप साधर्म्य आहे. म्हणून हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर मी मुद्दामून चन्द्रशेखर टिळकांच्या यु ट्यूब चेनेल वरची त्यांची या विषयावरची अलीकडच्या काळातील भाषणं ऐकली. त्यातून या विषयाचा एक वेगळाच पट डोळ्यांसमोर उभा राहिला. इतिहास व भूगोल हे राज्यशास्त्र इतकेच अर्थकारणाला पार्श्वभूमी पुरवत असते हा सरांचा विचारधागा मनोमन ठसत राहतो.
याच पुस्तकातल्या एका भाषणात कींवा प्रकरणात महिला उद्योजकतेची सांगड भोंडल्याच्या गाण्याशी घातली आहे. ती इतकी चपखल आहे ! मनात आले की वर्षानुवर्षे भोंडला आणि उद्योजकता या दोन्ही क्षेत्राशी संबंध असलेल्या एखाद्या महिलेलाही असं कधी सुचणार नाही.
या पुस्तकातले सगळ्यात मोठे प्रकरण म्हणजे " आपला रुपया. " आज कोरोनाच्या काळात इतर चलनांच्या तुलनेत आपल्या रुपयाचे मूल्यांकन हा विषय या ना त्या स्वरूपात चर्चेत आहे. या प्रक्रीयेशी किति वेगवेगळे घटक आणि किति वेगवेगळ्या प्रकारे निगडीत असतात आणि त्यात कसे बदल होतात याचं सविस्तर वर्णन या भाषणात येते. हे भाषण वाचत असताना सारखे असे मनात येत होते की आपल्या शिकण्याच्या काळात अशा पद्धतीने अर्थशास्त्र का शिकवत नाहीत ?
गुंतवणूक- अर्थशास्त्र- समाजशास्त्र- मानसशास्त्र - राज्यशास्त्र यांची गुंफण उलगडत अर्थकारण आपल्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी टिळक सर गेली तीन- साडेतीन दशके समर्थपणे पेलत आहेत. ती जबाबदारी आशयाला कुठेही धक्का न लावता आणि तरीही अशी चर्चा कुठेही कंटाळवाणे न करता ते कशी पार पडतात याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे या पुस्तकातली इतर प्रकरणे.
एकंदरीत काय, हे पुस्तक मूळात वाचण्याला पर्याय नाही. एकदा वाचलेत की वारंवार वाचत राहाल यांत शंका नाही.
बसल्या बैठकीत एकसंधपणे पुस्तक वाचून उठताना दोन गोष्टी जाणवल्या.
पहिली म्हणजे चन्द्रशेखर टिळक सर हे लेखणी आणि वाणी, अर्थशास्त्र आणि साहित्य, धोरण आणि अंमलबजावणी याचा अनोखा संगम आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे हे पुस्तक मी धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर नक्कीच काहीजणांना तरी " दिवाळी गिफ्ट " म्हणून देणार.... आनंद आणि अभ्यास याची दिवाळी म्हणजे हे पुस्तक."
डॉ. सुहास कुळकर्णी
दादर, मुंबई.
आजपर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची तपशीलवार माहिती
गुंतवणूक विषयक ::::
1. गुंतवणूक पंचायतन... पंधरावी आव्रूत्ती सध्या सुरू....राजहंस प्रकाशन.
2 . मार्केट मेकर्स.... तिसरी आव्रूत्ती... राजहंस प्रकाशन.... मसाप पुरस्कार विजेते पुस्तक.
3. गुंतवणूक तुमचीही माझीही..... परममित्र पब्लिकेशन्स
4. गुंतवणूक गुरु.
आर्थिक :::
5. अर्थानुभुती.... संवेदना प्रकाशन
6. मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती ....दुसरी आव्रूत्ती... मोरया प्रकाशन.
7. अर्थसंकल्प : अनेक अर्थ ... पाचवी आव्रूत्ती... मैत्रेय प्रकाशन.
8. अर्थानुभव... पाचवी आव्रूत्ती.... मैत्रेय प्रकाशन.
9. अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था.
10. The Budgetary Measures:: 1985 - 2000.
ललित लेख ::
11. मला भावलेले गुलजार ...दुसरी आव्रूत्ती... मोरया प्रकाशन.
( स्वतः गुलजार साहेबांनी गौरवलेले पुस्तक)
प्रवासवर्णन ( जरा हटके) ::
12. केल्याने देशाटन.... दुसरी आव्रुत्ती... मोरया प्रकाशन.
कथासंग्रह :::
13. मनापासून... नवीन कथासंग्रह... संवेदना प्रकाशन
14. भावमग्न... नवीन कथासंग्रह... संवेदना प्रकाशन
15. तरतम... नवीन कथासंग्रह... संवेदना प्रकाशन
16. अर्थस्वर... संवेदना प्रकाशन
17. जन्मझुला... संवेदना प्रकाशन
18. मल्हार मनाचा... दुसरी आव्रूत्ती.... मोरया प्रकाशन
19. मनातलं... मनातच .... दुसरी आव्रूत्ती.... कौशिक प्रकाशन.
कविता- संग्रह :::;
20 भावतरंग.... मोरया प्रकाशन
21. थेंब थेंब आयुष्य... संवेदना प्रकाशन
22. वही आयुष्याची.... संवेदना प्रकाशन
23. मनरंगी.... संवेदना प्रकाशन
24. लगोरी... संवेदना प्रकाशन
25. अस्तित्व.... संवेदना प्रकाशन
या पुस्तकांच्या खरेदी साठी मला 9820292376 वर कळवले तरी पुस्तके कुरियरने पाठवू शकेन.
ही पुस्तके
पै फ्रेंडस लायब्ररी ( डोंबिवली)
मजेस्टिक ( डोंबिवली , दादर )
गद्रे बंधू ( डोंबिवली )
रसिक साहित्य ( डोंबिवली)
इथेही उपलब्ध आहेत.
तसेच बुकगंगा वरही उपलब्ध
इतरही ठिकाणी ऑनलाईन.
आणि अर्थातच या पुस्तकांच्या खरेदीसाठी संबंधित प्रकाशकांनाही जरूर संपर्क करू शकता.
९ नोव्हेंबर २०२०.
No comments:
Post a Comment