Sunday, April 19, 2020

केल्याने देशाटन ... पुस्तक अभिप्राय (२)

सुप्रभात शेखर,

मी तुझं "  केल्याने देशाटन "  हे पुस्तक वाचलं .
 केवळ अप्रतिम!
 काय लिहीतोस रे खुप सुंदर, !

इडली काॅफी व मालक ही कथा वाचतांना ती नुसती वाचत नव्हते तर इतकी रंगून गेले की असं वाटतं की मी पण ते सगळं एंजाॅय करतेय.

 इतकं सुंदर लिहीतोस की आपल्या बरोबर वाचकाला पण त्या ठिकाणी घेऊन जातोस मग तो चहा असो,खारे दाणे, खिचडी, गुड का पराठा किंव्हा कैरी असो .
तसंच त्या कथांबरोबर मी मिझोराम, श्रीनगर, कलकत्ता आणि चंदीगडला पण फेरफटका मारून आले .
खुप एन्जोय केलं. .

तुझ्या लिखाणात तेव्हढी ताकद आहे .
मानलं तुला .
 माझ्याकडे तुझ्या लिखाणाची तारीफ करायला तुझ्यासारखी प्रतिभा नाही .
पण मनापासून सांगते की मला तुझं  लिखाण खुप आवडतं .
 खुप सुंदर लिहीतोस.

 proud of you 👍👍🙏🙏.

सुनीता शिरवळकर मुळे 
डोंबिवली .
१३ एप्रिल 2020 .



-------------------------------------xxx---------------------------------------

" नमस्कार .

आज केल्याने देशाटन चे दुसऱ्यांदा पारायण केले ...

मला ही फिरायला खुप आवडते . पण आधी जग फिरायचे नंतर आपला भारत देश .. तसेही बरेशी ठिकाणे पाहीलेली .

पण या कोरोना ने डोळे खाडकन उघडले . कारण " केल्याने देशाटन "

सर्व परिस्थिति स्थिर झाली की मी
मिझोराम बघणार आहे .
कारण केल्याने देशाटन

आणि सर्व भारत फिरताना आपले पुस्तक मात्र सोबत ठेवणार आहे .
तुम्ही अनुभवलेली सर्व खाद्य पदार्थांची चव चाखणार आहे ...
धन्यवाद कोरोना
केल्याने देशाटन ."


स्वाती मुळे - वाळुंज.
पुणे .
२९ मार्च २०२० 


( हॆ पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे ....अगदी ऑनलाईन सुद्धा ...तसेच मोरया प्रकाशनाच्या वेबसाईट वरही ... तसेच 9820292376 वरही पुस्तक खरेदीसाठी संपर्क करू शकता .)

1 comment:

  1. पुस्तक खरेदीसाठी 9820292376 वर आपला पत्ता पाठवल्यास पुस्तक कुरियर करेन.... अर्थात करोना गडबड संपल्यावर.

    ReplyDelete